पैशांसाठी विवाहितेला मारहाण करून छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवाहितेने माहेरहून १ लाख रूपये आणावे, यासाठी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी परिसरातील माहेर असलेल्या सिमा समाधान पाटील (वय-३०) यांचा विवाह गुजरात राज्यातील बारडोली येथील समाधान चिंधू पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसान झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही महिने चांगले गेले. त्यानंतर समाधान पाटील हा दारूच्या नशेत येवून विवाहितेला शिवीगाळ करून लागला. आणि माहेरहून तू जर १ लाख रूपये आणले नाही तर मी तुला वागवणार नाही अशी धमकी दिली. तर सासू आणि ननंद यांनी पैश्यांसाठी तगादा लावला होता. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. विवाहितने शुक्रवार २० मे रोजी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती समाधान चिंधू पाटील, इंदूबाई चिंधू पाटील, साधना रघुनाथ पज्ञटील सर्व रा. मरीमाता मंदीर, बारडोली, गुजराथ यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

 

 

 

Protected Content