सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील श्री आ गं हायस्कूल व श्री ना गो पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथील विद्यार्थ्यांची आज गुरुवार, दि. ११ ऑगस्ट रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले.
त्यात ११ वी व १२ वीच्या विद्यार्थिनीनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यची पटकथा व दिग्दर्शन विद्यालयाचे कलाध्यापक नंदू पाटील यानी केले. या पथनाट्यत एकूण चाळीस विद्यर्थ्यानिनी सहभाग घेतला होता. व N C C cadet यानी यात सहकार्य केले.
आपल्या स्वातंत्र्यचे,झेन्द्याचे ,शाहिद आनी बलिदान केलेल्या सैनिकांचे महत्व आणि देशप्रेम आणि झेंडा फड़कावताना काय काय काळजी घेतली पाहिजे याचा अंतर्भाव या नाटिकेत होता. विद्यार्थिनीनी तो संदेश अगदी व्यवस्थीत नागरिकांन पर्यंत पोहोचवला. तशा सुंदर प्रतिक्रिया नागरिकांन कडून येत होत्या. या पथनाट्यासाठी बी ए तेली, भारती महाजन यानी सहकार्य केले.
या पथनाट्यत भारत मातेचा एक चित्र्ररथ बैलगाडीवर बनवण्यात आला होता. तो नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत. चौका चौकात या पथनाट्याचे प्रयोग सादर करण्यात आलेत. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, मुख्याधिकारी किशोर चौहान, प्राचार्य सी. सी. सपकाले, पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे, यानी सदर विद्यार्थिनीचे कौतूक केलं. या वेळी एस एम महाजन, अनिल नेमाडे, एम. आय. तदवी, बी. जी. लोखंडे, कल्पना शिरसाठ, प्रणाली काटे आदींची उपस्थिती होती.