
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आनंद वाटला तरच आनंद वाढतो आणि आयुष्य अधिक समाधानकारक होते, असा जीवनमूल्यांनी परिपूर्ण संदेश ह.भ.प. राजेंद्र गवळी महाराज यांनी भुसावळातील जेष्ठ नागरिकांच्या सभेत दिला. ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित “वासुदेव जेष्ठ नागरिक संघा”ची मासिक सभा रिंग रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आध्यात्मिक मंत्रोच्चार, भक्तिभाव आणि विचारमंथनाने भरलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्व प्रार्थना आणि हनुमान चालीसाच्या पठणाने वातावरणाला भक्तिमय रंग चढला. त्यानंतर “हरे राम… हरे कृष्ण…” या गजरात प्रवचनाला सुरुवात झाली. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, प्रमुख पाहुणे ह.भ.प. दिपक महाराज, संजय चौधरी आणि भानुदास पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची शोभा वाढली.
“आनंदाची परिभाषा” या विषयावर बोलताना ह.भ.प. दिपक महाराज म्हणाले की प्रत्येक व्यक्तीची आनंदाची भाषा वेगवेगळी असते. कोणाला मित्रत्वात आनंद मिळतो, कोणाला स्वयंपाकात, तर कोणाला गायन, राजकारण किंवा नातवंडांसोबतच्या क्षणांत आनंद मिळतो. सुख ही शारीरिक क्षमता आहे, तर आनंद ही शुद्ध मानसिक अवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद म्हणजे परिस्थितीनुसार बदलणारी भावना नसून, मनःस्थितीला सकारात्मक बनवणारा दिव्य अनुभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सभेत वाढदिवस असलेल्या रमेश चौधरी, पुंजो भारंबे, हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे, भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे आणि दिलीपसिंग चौधरी यांचा उपरणे व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित सभासदांमध्ये सुरेश बेलसरे, रमण भोगे, प्रमोद बोरोले, विजया भारंबे, ज्योती चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे, अलका इंगळे, अशोक नेहेते व अनेक मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सचिव सतीश जंगले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, धनराज पाटील, भास्कर खाचणे आणि भानुदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. विश्वकल्याण प्रार्थनेने कार्यक्रमाचा भावपूर्ण समारोप करण्यात आला.
दरम्यान, ह.भ.प. दिपक महाराज यांनी आनंदाच्या नकारात्मक पैलूवरही विनोदी उदाहरण देत सांगितले की, “मित्राला लॉटरी लागली पण तिकीट सापडत नाही, म्हणून दुसरा मित्र फटाके फोडून आनंद साजरा करत होता,” हे मानवी मनोवृत्तीचे गंमतीशीर दर्शन घडवणारे कथन उपस्थितांना खूप भावले.



