जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हनुमानजींच्या अभिषेक-पूजन, हनुमान चालीसा पठण व महाप्रसाद यांचा समावेश होता. कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी आशिष भिरूड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या प्रसंगी उपाध्यक्ष सुभाष पाटील, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि संचालक डॉ. वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, गोदावरी अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रवीण फालक तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व गोदावरी फाउंडेशनचे राजपुरोहित डी. टी. राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केतकी मेडीकोजच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन :
हनुमान जन्मोत्सव व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे सुपुत्र व प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. अनिकेत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, गोदावरी फाउंडेशन संचालित ‘केतकी मेडीकोज’च्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटल येथे करण्यात आले.
शाखेचे उद्घाटन केतकी मेडीकोजचे प्रमुख निलेश पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून झाले. या वेळी हनुमान पूजन करण्यात आले असून, सर्व कर्मचारी वर्ग उत्साहात सहभागी झाला होता.