अंतुर्ली येथे मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी हनुमान मंदिरात पूजा-अर्चा, आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज नगर पाटील वाडा येथे विशेष भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या भंडाऱ्याला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दोन वाजेपर्यंत सुरू असलेल्या या प्रसादाच्या कार्यक्रमात भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी इंदिरा नगर येथील निळकंठेश्वर महादेव मंदिरातून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेचे आयोजन शिवपुत्र मित्र मंडळ, इंदिरा नगर अंतुर्ली यांनी केले होते.

शोभायात्रेत एका लहान मुलाने हनुमानाची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले. शोभायात्रा इंदिरा नगरहून सुरू होऊन बस स्टँड, दुट्टे वाडा, दाणी वाडा, गुर्जर वाडा आणि पाटील वाडा या मार्गावरून पार पडली. या शोभायात्रेला गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. अशा प्रकारे अंतुर्ली गावात संपूर्ण दिवसभर हनुमान जन्मोत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाले.

Protected Content