पाल येथील वन विभागाच्या झुलत्या पुलाची दुर्दशा

hanging bridge pal

रावेर प्रतिनिधि । तालुक्यातील पाल येथील वन विभागाच्या झुलत्या पुलाची दुर्दशा झाली असून यामुळे पर्यटकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत वृत्त असे की, ठंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले पाल येथे वन विभागाचे पर्यटन स्थळ आहे. येथे राज्य-पराज्यातुन पर्यटक याठिकानी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात परंतु येथील सर्वात मोहक आणि लक्षणीय असलेल्या झूलत्या पुलाकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या पुलावरुन चालण्यासाठी लावण्यात आलेले पत्रे उखडून निघले आहेत. यामुळे पर्यटकांना ये-जा करण्यासाठी अडचन निर्माण होत आहे.

पाल येथे सुटीच्या दिवशी परिसरातील शाळकरी मुले येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पाल मध्ये येतात परंतु या पुलाची पत्रे उखडल्याने त्यावरून ये-जा करण्यास खुप अडचन निर्माण होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाला दुखापत होऊ शकते. यामुळे वन विभागाने हा पूल दुरूस्त करावा अशी मागणी होत आहे.

Protected Content