जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघात ८ हजार ३९३ तर रावेर लोकसभा मतदार संघात ६ हजार ५२५ असे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात एकूण २३ हजार ३११ मतदार दिव्यांग आहेत. त्यांना मतदानासाठी मदतीची गरज असून ती गरज प्रसानातर्फे पुरविली जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघातील मदतीची गरज असणारे अंध, दिव्यांग व आजारी मतदार
यात जळगाव शहरात ६५३ दिव्यांग मतदार असून त्यापैकी २ मतदारांना व्हीलचेअरची आवश्यकता आहे. १४ मतदारांना वाहुतुक सुविधेची गरज आहे. तर ३२ दिव्यांग मतदारांना मदतनीसाची आवश्यकता भासणार आहे. ९९ अंध मतदारांना ब्रेल लिपीची आवश्यकता आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात १ हजार ४९ दिव्यांग मतदार असून १४ जणांना व्हीलचेअर लागणार आहे. ५१ मतदारांना वाहतूक सुविधेची गरज असून २२२ दिव्यांग बांधवाना मदतनिसाची आवश्यकता आहे. १२६ अंध मतदारांना ब्रेल लिपीची आवश्यकता असणार आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघात सर्वात अधिक दिव्यांग मतदार आहेत. या मतदार संघात २ हजार २१९ मतदार दिव्यांग असून ४० जणांना व्हीलचेअरची आवश्यकता आहे. २५ जणांना वाहतुक सुवेधीची गरज आहे. १५६ जणांना मदतनीसाची गरज आहे. या मतदार संघात सर्वाधिक ब्रेल लिपीचा वापर करणारे मतदार म्हणजेच ३०३ मतदार आहेत. या मतदार संघातील १ मतदार हा स्ट्रेचरचा वापर करणार आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघात १४१२ दिव्यांग मतदार असून यात सर्वाधिक व्हीलचेअरची गरज असणारे म्हणजेच २२० मतदार असून, सर्वाधिक वाहतूक सुविधेची गजर असणारे व मदतनीसाची गरज असणारे प्रत्यकी म्हणजेच १३६१ मतदार असून १८९ मतदारांना ब्रेल लिपीची आवश्यकता भासणार आहे. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात २ हजार ९१ मतदार दिव्यांग असून यात १०२ मतदारांना वाहतुकीची सुविधा तसेच १९२ मतदारांना मदतनीसाची तर २४८ मतदारांना ब्रेल लिपीची आवश्यकता आहे. पाचोरा विधानसभा मतदार संघात ९६९ मतदार दिव्यांग असून यात ४२ मतदार व्हीलचेअर, १२२ मतदारांना वाहतूक सुवेधेची, १७३ मतदारांना मदतनीसाची तर १७३ मतदारांना ब्रेल लिपीची आवश्यकता आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातील मदतीची गरज असणारे अंध, दिव्यांग व आजारी मतदार
रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा विधानसभा मतदार संघात १ हजार ७६९ दिव्यांग मतदार असून यात ६१ मतदारांना व्हीलचेअरची आवश्यकता असून १९६ मतदारांना वाहतूक सुविधेची, १६५ मतदारांना मदतनीसाची तर ३५२ मतदार हे ब्रेल लीपीचा वापर करणार आहेत. रावेर विधानसभा मतदार संघात १०५२ मतदार दिव्यांग असून यात ६७ मतदारांना वाहतूक व्यव्स्थेची गरज असून १५९ जणांना मदतनीसाची गरज लागणार आहे. ३६८ जण ब्रेल लिपीचा वापर करणार आहेत. भुसावळ विधानसभा मतदार संघात १ हजार ६७७ दिव्यांग मतदारांपैकी २४ मतदार हे व्हीलचेअर वापरणार आहेत. वाहतूक सुविधा व मदतनीस हे प्रत्येकी ८८३ आहेत. तर १८९ जणांना ब्रले लिपीची गरज असणार आहे. जामनेर विधानसभा मतदार संघात ८३१ दिव्यांग मतदार असून ९८ जणांना वाहतूक सुविधा व ११४ जणांना मदतनीसांची तर ६३ मतदारांना ब्रेल लिपीची आवश्यकता आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात १ हजार १९६ मतदार दिव्यांग असून ७० मतदारांना व्हीलचेअरची आवश्यता आहे. १६० जणांना वाहतूक सुविधा व १५९ जणांना मदतनीसाची गरज असणार असून २९६ जणांना ब्रेल लिपीची आवश्यता भासणार आहे.