मुंंबई, विशेष प्रतिनिधी | शिक्षकांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री यांनी न घेतल्यामुळे शाळा कृती समितीतर्फे वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला रोखण्याचं काम पोलिस प्रशासनाने केलं.
आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शिक्षक हजारोंच्या संख्येने शिक्षक आजाद मैदानात उपस्थित आहेत. या शिक्षकांच्या मागण्या आहेत १४६ घोषित १६५६ अनुदानास पात्र ठरलेली यादी आहे. या यादीचा शासन निर्णय जाहीर करून या शिक्षकांना पगार देण्यात यावा. गेल्या १८ वर्षांपासून शिक्षक विनावेतन काम करत आहे. मागील १० दिवसांपासून आझाद मैदान येते शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. अनके शिक्षकांच्या आत्महत्या सुरू आहे. तरी शासन दखल घेत नाही नसल्याने शिक्षकामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.