जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नूतन मराठा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्याहस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रंथदिंडीचा मार्ग आणि स्वरूप:
महाविद्यालयापासून सुरू झालेली ही ग्रंथदिंडी ज्ञानेश्वर मंदिरात समाप्त झाली. ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मराठीतील प्रसिद्ध कवींच्या कवितांच्या ओळी आणि घोषवाक्यांचे फलक हातात घेतले होते. “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात आणि “माय मराठी चिरायू होवो” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पालखीत लिळाचरित्र, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, संत नामदेवांची अभंगवाणी, संत एकनाथ महाराज यांच्या भारुड गाथा, वच्छहरण, ययाती, विशाखा, अष्टदर्शने, नटसम्राट, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, ताम्रपट यांसारखे मराठी साहित्यातील उत्कृष्ट ग्रंथ ठेवण्यात आले होते.
उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी:
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, उपप्राचार्या एम. एस. पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर, प्रा. डी. आर. चव्हाण, प्रा. एन. जे. पाटील, प्रा. इंदिरा पाटील, प्रा. डॉ. राहुल संदानशिव, प्रा. भागवत पाटील, प्रा. भाऊसाहेब पडलवार, प्रा. घनश्याम पाटील, प्रा. राकेश गोरसे, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी, प्रा. डॉ. मंगला तायडे, प्रा. तेजल पाटील, प्रा. वंदना पाटील, प्रा. कार्तिक देसाई यांसह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.