जळगाव प्रतिनिधी – चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पकडलेल्या गुटखा प्रकरणातील अधिकार्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्युज’ला दिली.
अधिक माहिती अशी की , गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या खोट्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. यात तब्बल सुमारे 50 लाखाहून अधिक असलेला घुटका पोलिसांनी हस्तगत केला होता. यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील मेहुणबारे येथे पकडलेला ट्रक जळगावात नेण्याऐवजी मेहुणबारे पोलिसात का नेण्यात आलं नाही? या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी चौकशी करून तब्बल 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यात मेहुणबारेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे 7 कर्मचारी यांचा समावेश आहे. यासंदर्भात लाईव्ह ट्रेन न्युज पोलीस अधीक्षक यांनी बोलताना माहिती दिली.