कंडारी येथे शासनाच्या भूखंडावर अतिक्रमण धारकांचा कब्जा

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथील शासनाच्या भूखंडावर अतिक्रमण धारकांनी कब्जा केल्या असल्याचे दिसून आले असून याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील कंडारी गावामध्ये शासना मार्फत गट नंबर 230/2 हा भूखंड गौतम हौऊसिंग सोसायटी करीता दिलेला होता.सोसायटीने त्या जागेमध्ये प्लॉटची आखणी करून संचालक,सभासदांसाठी घरे बांधकाम करून दिले होते.तर उर्वरित भूखंड हा गुरचरण व सामाजिक वनीकरण यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे.आज रोजी शासनाच्या भूखंडावर अतिक्रम धारकांचा कब्जा असून भूखंडाची विक्री साफ-सफाई करून 5 हजारात प्लॉट विक्री सुरू असल्याचे खात्रीदायक वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे. कंडारी गावामध्ये गौतम हौऊसिंग सोसायटीला शासना मार्फत गट नंबर 230/2 हा भूखंड मिळालेला होता.यामध्ये 116 प्लॉट पाडण्यात आले होते.त्यातील 100 प्लॉट संचालक, सभासदांना देऊन त्यावर तीस वर्षांपासून घरे बांधण्यात आलेली असून आजरोजी रहिवासी आहे.तर त्याच गटातील शासनाचा भूखंड गुरचरण व सामाजिक वनीकरण यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. शासनाच्या गुरचारण भूखंडामधील एक एकर जागेवर एक वर्षांपासून राहुल उत्तम धुंडले या इसमाने दादागिरी करून कब्जा केलेला आहे. तसेच त्या जागेवर घरे,गुरे,कोंबड्या, बकऱ्या,घोडे यांचे गोठे तयार करून कुत्रे ही पाळलेले आहेत. तसेच जमिनीचे तुकडे 5 हजार रुपयात विक्री करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर शासनाच्या जागेवर अतिक्रमण करणारा इसम रेल्वे कर्मचारी आहे.या कर्मचाऱ्यांला रेल्वे निवास असून त्यामध्ये न राहता शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोसायटीच्या मागील बाजूस त्यांचा काही संबंध नसतांना ती जागा हडप करून त्यावर बांधकाम करीत आहे. तक्रारदार गौतम हौऊसिंग सोसायटीचे चेअरमन,संचालक तसेच सभासद यांनी विचारणा केली असता अरेरारीची भाषा व उध्दट पणाने उत्तर देत आहे.मी वरच्या सर्व अधिकाऱ्यांना पैसे दिलेले आहे.त्यामुळे माझे कोणी काही करणार नाही असे भाषशैली वापरत आहेत.सदर जागा ही गुरचरणाची आहे.त्यावर प्रतिबंध करणेचे शासनाचे परिपत्रके अनुक्रम 2007,2010,2013 अशी वेळेवेळी निघालेली आहेत.गुरचरण व सामाजिक वनीकरण यावर अतिक्रमण असल्यास ते काढून टाकणे,अतिक्रमण होऊ न देणे असे शासनाचे आदेश असतांना जागेवर अतिक्रमण करणे सुरू आहे. शासन परिपत्रक दिनांक 7/9/2010 व 2013 चे परिपत्रका नुसार ज्या विभागात अतिक्रमण होत असेल त्या विभागातील संबंधित अधिकारी तहसीलदार,ग्रामसेवक,सरपंच,तलाठी हे जबाबदार राहतील असे स्पष्ट आदेश आहेत.तसेच अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आहेत.वरील सर्व आदेश असून सुद्धा संबंधित अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सदर अवमानना होत आहे. याबाबतची तक्रार जिल्ह्याधिकारी यांना चेअरमन,संचालक मंडळ व सभासद गौतम हौऊसिंग सोसायटी कंडारी यांनी दिनांक 17/5/2020 रोजी दिलेली असून अर्जावर आर.एम.वाघ, इंदूबाई अर्जुन सुरवाडे,शिवा भगवान लोंखडे, सत्यनारायण, बी.एम.बोराडे, एस.आर.सपकाळे, एम.जे.निकम, निजाबाई निकम, रंजना सपकाळे, विजय लोखंडे अशांनी सह्या केलेल्या आहेत.कोरोनाच्या पाश्वभूमीमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू झाल्यामुळे कदाचित तक्रार अर्जाची चौकशी न झाल्याने अतिक्रमण धारकांची हिम्मत वाढल्याने झोपडपट्टी भागातील चार ते पाच तरुणांना हाताशी घेऊन अतिक्रमण धारकाने नवीन फ़ंडा सुरू केला असून शासनाच्या भूखंडाचे तुकडे पाडून 5 हजार रुपयात विक्री करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून शासन या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.शासनाच्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर शासन कारवाई करून अतिक्रमण काढणार का? याकडे तक्रारदार गौतम हौऊसिंग सोसायटी कंडारीचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content