गुरुवर्य प. वी. पाटील विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | के सी ई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले तसेच त्यांना गुलाब पुष्प शैक्षणिक साहित्याची भेटवस्तू तसेच लाडू देऊन ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रवेशोत्सवासाठी संपूर्ण शाळा फुले, फुगे तसेच रांगोळ्यांनी सजवण्यात आली. शाळेतील प्रत्येक फलकावर सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आठवण चिरंतन मनात राहावी यासाठी सुंदर असा सेल्फी पॉईंट सुद्धा तयार करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुद्धा याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका स्वाती पाटील ,कायनात सय्यद तसेच मंगल गोठवाल यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कसे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content