दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आव्हाण शिवारातील सत्यम पार्क येथील विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे अशी मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवार २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारातील सत्यम पार्क येथील माहेर असलेल्या तृप्ती कमलेश जळतकर (वय-३२) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील कल्पेश शामकांत जळतकर यांच्यासोबत सन २०२० मध्ये रीतीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान आई-वडिलांचे परिस्थिती हालाखीची असल्यामुळे विवाहितेने पैसे आले नाही. याचा राग येऊन पती याने मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला तसेच सासरच्या मंडळींनी देखील पैशांसाठी मागणी करत छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या, दरम्यान बुधवार २६ एप्रिल रोजी दुपारी रात्री ८ वाजता विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती कमलेश श्यामकांत जळतकर, सासू रत्ना शामकांत जळतकर आणि शितल शेखर भागवत सर्व रा. आमोदे फाटा शिरपूर ता.जि. धुळे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content