खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनेक वेळा आपण शिक्षक आणि विद्यार्थ्यांबद्दलचे नको ते प्रकार ऐकतो, पाहतो पण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एका गावात शिक्षकाने स्वतः प्रेम कविता लिहून चक्क ती शिक्षिकेच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यानंतर विवाहित शिक्षिकेने खामगाव ग्रामीण पोलीसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ५२ वर्षीय शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. रोहीदास रामदास राठोड असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेत कार्यरत असलेल्या ५२ वर्ष शिक्षकाने प्रेम कविता लिहिली. ही कविता सोशल मीडियावर एका विवाहित शिक्षकेच्या नावाने व्हायरल केली. तसेच विवाहित शिक्षिका शाळेत कार्यरत असताना तिच्याकडे एकटक पाहात तिचा विनयभंग केला. तसेच तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची तक्रार सहकारी शिक्षकेने ग्रामीण पोलिसात दिली.
या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आहे. शेगाव येथील घटनेनंतर खामगाव येथे शिक्षकेच्या विनयभंगाचं प्रकरण शिक्षण क्षेत्रात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकंदरीत शाळेत विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांनी स्वतः प्रेम कविता लिहून चक्क ती एका शिक्षकाच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याने गुरुजी ‘हे वागणं बरं नव्हं’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.