नशिराबाद विद्यामंदिरात गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी

नशिराबाद – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. 

सर्वप्रथम सरस्वती पूजनानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रविण महाजन तर मंचावर उपशिक्षिका मंगला चौधरी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थांनी आपल्या वर्ग शिक्षकांचा सत्कार केला तसेच काही विद्यार्थांनी गुरुंबद्दल आदर व्यक्त करून भाषणे सादर केलीत. त्यात ईश्वरी करुले, भूमी शिवरामे, ऋषि पाटील, योजना ब्रहाटे,  कोमल धनगर, यश भारुळे, तनुजा पाटील, विजयकुमार सराफ, लूब्धा चौधरी, यज्ञा सैतवाल, विधी कावळे इत्यादी विद्यार्थांनी भाषण सादर केली.

त्यानंतर उपशिक्षका ज्योती बारी यांनी गुरु पौर्णिमा आपण का साजरी करतो त्याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रविण महाजन यांनी विद्यार्थांना आपल्या जीवनात गुरुंचे महत्व काय असते याची जाणीव विद्यार्थांना करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती अत्तरदे यांनी केले तर नियोजन भावना भावसार यांनी केले त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.