Home Cities जळगाव जळगावात श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव: विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगावात श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव: विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
270

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च असून, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा. अशा या दिव्य गुरुतत्त्वाच्या पूजनाचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. यानिमित्ताने जळगाव शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), गुरुकुल कॉलनी, क्राऊन बेकरी मागे, सेट. जोसेफ स्कूल जवळ, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दिनांक १० जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल, त्यानंतर दिवसभर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत गुरुपूजनाचा कार्यक्रम सुरू राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी आरती व महानैवैद्य अर्पण करण्यात येईल. सकाळी ११ वाजता मार्गदर्शन व सामुदायिक श्री स्वामी चरित्र वाचन होईल, तर सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सायंकाळची आरती होईल. या व्यतिरिक्त, ११ माळ जपाचे आयोजनही करण्यात आले आहे.

या पवित्र दिवशी जास्तीत जास्त संख्येने सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांनी आपल्या घरातील व परिसरातील मित्रमंडळींसह उपस्थित राहून अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद घ्यावे, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे. हा उत्सव स्वामी भक्तांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.


Protected Content

Play sound