जयपूर । गुर्जर समाजासह अन्य चार समाजांना राजस्थान सरकारने ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली असली तरी मात्र या समाजाचे आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
राजस्थानात गुर्जर समाजाचे आंदोलन चिघळले असतांना आता सरकारने आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानच्या विधानसभेत बहुमताने मंजूर झालेल्या या ठरावात गुर्जरांसह पाच समुदायांना आरक्षण देण्यात आले. यामध्ये सरकारी नोकरी आणि शिक्षणात अशा दोन विभागांमध्ये आरक्षण दिले जाणार आहे. मात्र गुर्जर नेते बैंसला यांच्या मते, कुठल्याही न्यायालयात अडकून पडणार नाही अशा आरक्षणाच्या विधेयक आणि कायद्याची आपल्याला अपेक्षा असल्याचे सांगितले. यामुळे गुर्जर समाजाचे आंदोलन सुरूच राहण्याची शक्यता आहे.