भुसावळात दुचाकी चोरटा अटकेत

भुसावळ प्रतिनिधी। शहरातून होंडा शाईन दुचाकी चोरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग 5 गुरंन-02/2019 भा द वि कलम-379 दिनांक 26.02.2019 रोजी दाखल गोटा. या गुन्ह्यात 25000 रु किमती ची होंडा शाइन मोटार सायकल चोरी झाली होती. या गुन्ह्यात गुप्त बातमी दारा मार्फत माहिती काडून संशयित आरोपी विनय उर्फ बंटी संजय बाविस्कर ( वय-19 रा. पंधरा बंगला भुसावळ) याने चोरी केल्याची माहिती मिळाली. तो भुसावळ शहरात खडका चोफुली येथे आल्याची बातमी मिळताच संशयित आरोपी यास ताब्यात घेण्यात आले असूनआरोपी म याने मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व पो नि देविदास पवार यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठचे स फो तस्लिम पठाण, पो हे का सुनील जोशी,पो ना सुनील थोरात, पो का विकास सातदिवे, महेश चौधरी, ईश्वर भालेराव यांच्या पथकाने केली आहे.

Add Comment

Protected Content