‘गली बॉय’ला भारताकडून ‘ऑस्कर’साठी नामांकन

gully boy

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | रणवीर सिंग अभिनीत ‘गली बॉय’ हा सिनेमा भारताकडून ९२व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटेगरीसाठी ‘गली बॉय’ची भारताकडून निवड करण्यात आली आहे.

 

‘गली बॉय’सह ‘उरी, द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केसरी’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘अंधाधून’ आदी चित्रपट ऑस्करवारीच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व सिनेमावर ‘गली बॉय’ने मात केली आहे. गेल्या वर्षी भारताने ऑस्करसाठी ‘व्हिलेज रॉकस्टार’ची निवड केली होती. ‘गली बॉय’ या सिनेमात रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका आहे. झोया अख्तरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गली बॉय’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा’चा पुरस्कारही ‘गली बॉय’ला मिळाला होता. धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. यापूर्वी झोया अख्तरने ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘दिल धडकने दो’ आदी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

Protected Content