नंदुरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेल्या वादावर भाष्य करत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांना थोडे सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे नंदुरबार जिल्हा दौर्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांना एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादाबाबत प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, राजकारण म्हणजे कुस्तीचा आखाडा असतो. यात कुणी अरे म्हटले की याला कारे म्हणावेच लागते. तथापि, राजकीय विरोध असतांना काही पथ्ये पाळण्याची गरज असते. या दोन्ही नेत्यांमधील कटुता कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर, दोन्ही नेत्यांनी थोडे सबुरीने घ्यावे असा सल्लादेखील त्यांनी दिला.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौर्यावर देखील टीका केली. ते आधीच आमदारांना घेऊन फिरले असते तर आजची वेळ आली नसती. आणि त्यांना बिहारला जावे लागले नसते, तर तेजस्वी यादव हेच महाराष्ट्रात आले असते असा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी लगावला.