भुसावळ प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्या एकच प्याला अमृततुल्य टी पॉइंटला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन स्वादीष्ट चहाचा आस्वाद घेतला.
येथील ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांनी अलीकडेच एकच प्याला अमृततुल्य टी पॉइंट हे दुकान सुरू केले असून याला ग्राहकांची पसंती मिळाली आहे. आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे भुसावळ येथे आले असता ते आवर्जून या दुकानावर गेले. येथे त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी त्यांच्या सोबत नगरसेवक मनोज बियाणी, राजू पारख आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथील जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाच शहरातील पत्रकारांसोबतचे ऋणानुबंध व्यक्त केले होते. याप्रसंगी त्यांनी संजयसिंग चव्हाण यांचा उल्लेख केला होता. आज राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असतांनाही ना. पाटील यांनी जुने संबंध जोपासून आपल्या दुकानाला दिलेली भेट ही अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन संजयसिंग चव्हाण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना केले.