शहरातील गणेश मंडळांना परवानगीसाठी पोलीस ठाण्यात ‘एक खिडकी योजना’

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सवा मंडळांसाठी एक खिडकी योजना शहरातील सर्व पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या दिनी राबविण्यात येत आहे.

जळगाव शहरात आगामी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे एक खिडकी योजना एका ठिकाणी न राबविता शहरातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये १७ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या ४ दिवसांमध्ये सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याठिकाणी महापालिका प्रशासन, धर्मादाय आयुक्‍त, विद्यूत विभाग आणि पोलीस प्रशासन यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहे. तरी शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी परवनगी घेण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क साधवा, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content