धरणगाव प्रतिनिधी । उध्दव ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबभाऊ पाटील यांनी मंत्रीपदाची नुकतीच शपथ घेतली आहे. आज धरणगावात पोटनिवडणुकीत शिवसेनेला मिळालेला विजय आणि गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद अशा दुहेरी आनंदाचा जल्लोष शिवसैनिक साजरा करत आहेत.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात नुकतेच दणदणीत मताधिक्याने निवडून आलेले आमदार गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळाले आहे. ठाकरे सरकारच्या आज (सोमवार) दुपारी झालेल्या शपथविधीत गुलाबराव पाटील यांनी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. कालपर्यंत गुलाबभाऊंना नेमके कोणते खाते मिळणार याबद्दल माहिती समोर नव्हती. परंतू त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात होते. यामुळे जळगाव ग्रामीण अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रविवारी रात्री मुंबई येथे रवाना झाले होते. दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर मंगळवारी सकाळी गुलाबभाऊ पाटील यांचे आगमन होणार असून याप्रसंगी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्याची तयारी देखील त्यांच्या समर्थकांनी केली आहे. या माध्यमातून लागोपाठ दुसर्यांदा त्यांच्याकडे मंत्रीपदाची धुरा येणार आहे.
https://www.facebook.com/MahaDGIPR/videos/597234214367117/