मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या विस्तारात Gulabrao Patil गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्री म्हणून त्यांचा हा तिसरा तर कॅबिनेट मंत्री म्हणून दुसरा शपथविधी आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार झाला. राजभवनात सकाळी अकरा वाजेपासून शपथविधी सोहळा सुरू झाला असून यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
गुलाबराव पाटील हे आपल्या राजकीय कारकिर्दीत तिसर्यांदा मंत्री बनले आहेत. जुलै २०१६ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ते सहकार राज्यमंत्री होते. यानंतर २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते ३० जूनपर्यंत पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. आता त्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली. गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटातर्फे पहिल्या क्रमांकाने आणि एकूण सहाव्या क्रमांकाने आपल्या पदाची शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात ठिकाठिकाणी शिंदे गटातर्फे जल्लोष करण्यात आला. गुलाबभाऊंना लवकरच कोणते खाते मिळणार ते स्पष्ट होणार आहे.