Home Cities धरणगाव याच चार-पाच डाकूंनी शिवसेनेचा सत्यानाश केला : गुलाबराव पाटील

याच चार-पाच डाकूंनी शिवसेनेचा सत्यानाश केला : गुलाबराव पाटील

0
35

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव आणि बुलढाण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व पाणी पुरवठा योजनांचं ई-भूमिपूजनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेतील गर्दीबाबत खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत खुर्च्या रिकाम्या असल्याचा आरोप केला होता. याबाबत ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, गर्दी जमवणारे लोक तुम्ही वापस पाठवली आणि आता दुसर्‍यांची गर्दी दाखवून काय उपयोग आहे. तडीपार्‍या,खून प्रकरणात आम्हाला खोटं अडकवलं गेलं. जेलमध्ये वर्षे वर्षे आम्ही राहिलो आणि आज तुम्ही वल्गना करतायत असे ते म्हणाले.

ना. गुलाबराव पाटील खासदार संजय राऊत यांच्याबाबत पुढे म्हणाले की, कधी नगरसेवक न झालेला हा माणूस आमच्यावर टीका करतोय. खरं तर उद्धव ठाकरे यांना चुकीचे फिडींग करण्यामध्ये हेच चार-पाच डाकू होते. ’डाकू’ हा शब्द असंसदीय असल्याने त्याची वाचत्या होईल.पण, याच लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली असल्याची घणाघाती टिका ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केली.


Protected Content

Play sound