मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या टिकेला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांमधील नाराजी पाहता अजून त्यांना प्रत्येकी पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप केला होता. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोणी काही म्हणतंय. ५ कोटी घेतले असं म्हणतात. ही रक्कम मोजायला ते गुवाहाटीला गेले होते का ते सांगावं? सर्व आमदार श्रद्धेने कामाख्या देवीला गेले होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार जनहिताच्या कामांना प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.