धरणगाव प्रतिनिधी । सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पहिल्यापासून घेतलेली आघाडी आता वाढली असल्याने त्यांचा विजय दृष्टीक्षेपात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ना. गुलाबराव पाटील यांना अपक्ष चंद्रशेखर अत्तरदे, राष्ट्रवादीच्या पुष्पाताई महाजन आणि अपक्ष रवी देशमुख यांनी आव्हान दिले होते. निवडणुकीच्या धामधुमीत ना. पाटील यांना विरोधकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अनेक जवळचे सहकारी सोडून गेले. त्यांनी गुलाबभाऊंवर जोरदार टीकास्त्र सोडले. तरी ते डगमगले नाहीत. शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रचाराची धुरा अक्षरश: एकहाती सांभाळली. यामुळे आज टपाली मतदानात घेतलेली आघाडी आता टिकून असल्याचे दिसून आले आहे. सहाव्या फेरच्या अखेरीस ना. गुलाबराव पाटील यांना १३ हजारांपेक्षा जास्त आघाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या सुरू असणारा ट्रेंड पाहता हा लीड तोडणे कठीण असल्याने ना. गुलाबराव पाटील यांचा विजय दृष्टीक्षेपात असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.