पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यंदाची दिवाळी ही साधेपणाने साजरी केली.
यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे दिवाळी हा सण फटाकेमुक्त आणि नियमांचे पालन करून साजरे करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. या अनुषंगाने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यंदाची दिवाळी ही साधेपणाने साजरी केली.
ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील आपल्या घरी अतिशय साधेपणाने दिवाळी साजरी केली. कुटुंबियांसोबत वेळ घालवून लक्ष्मीपूजन करून त्यांनी दिपोत्सव साजरा केला.