गुलाबराव देवकर यांची म्हसावद येथे प्रचार, संवाद रॅली

WhatsApp Image 2019 04 19 at 1.52.41 PM

म्हसावद  (प्रतिनिधी)  आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाई व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी प्रचारार्थ म्हसावद गावातील पदाधिकारी , ग्रामंस्थ व युवावर्गा शी संवाद साधत परिवर्तनाचे आवाहन केले.

 

आपण आपल्या पालकमंत्रीपदाच्या काळात जळगाव ग्रामिण मतदार संघासह जिल्हाभरात विविध विकास कामांना चालना दिलेली आहे.  आपल्या कार्यकाळात सुरू झालेल्या गावातील रेल्वे उड्डाण पूलाच्या कामासाठी या पाच वर्षाच्या युतीच्या काळात कुठलाही पाठपुरावा झालेला दिसत नाहीत.  यासाठी आपण भाजपाच्या भूलथापांना आता बळी न पडता सिंचन , रस्ते , उद्योग व्यवसायासह रखडलेल्या विकास कामांना चालना देण्यासाठी आपले गाव व परिसरातून आधिक मताधिक्ये देत दिल्ली दरबारी पाठवावे , असे आवाहन प्रचारादरम्यान झालेल्या कॉर्नर बैठकीत  देवकर यांनी ग्रामंस्थाना केले. या  प्रचार व संवाद रॅली दरम्यान गावातील हनुमान मंदिर , मरीआई माता मंदिर , शांकभरी माता , संप्तशृंगी देवी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत वंदन व आशिर्वाद घेतले, या प्रचारात पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील , तालुकाध्यक्ष बापू परदेशी , युवक तालूकाध्यक्ष विनायक चव्हाण , ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मधुकर पाटील , डॉक्टर्स सेल तालूकाध्यक्ष डॉ. सुधाकर पाटील , कैलास पाटील , संजय पाटील , माधवराव पाटील , तुकाराम दादा पाटील ,  प्रविण पाटील ,  शैलेंद्र चव्हाण , विक्की चव्हाण , सलीम बागवान , बापू धनगर , पिंटू पाटील , भागवत पाटील , सादिक पटेल ,भैय्या पटेल , पंढरीनाथ पाटील , मधुकर बळीराम पाटील , ए.एल. आण्णा , श्रीकांत पाटील , अर्जुन पाटील , हिरामण पाटील , अनिल पाटील , बबलू बागवान , प्रभाकर पाटील , जुलाल पाटील , शंकर पाटील यांच्या सह बहुसंख्य ग्रामंस्था बरोबर वावडद्याचे रवी भाऊ कापडणे , पाथरीचे सरपंच शिरीष जाधव , उपसरपंच निलेश पाटील , सदस्य संतोष नेटके , बोरनारचे नाना पाटील , नजीम पटेल , जळकेचे अर्जुन पाटील , वाकडीचे ईश्वर पाटील ,लमांजनचे गोकुळ पाटील , गोरख पाटील , राजू पाटील यांच्यासह ईतर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content