चाळीसगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघातून सातत्याने भाजपचे खासदार निवडून येत असले तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास केला नसल्याचा आरोप आज राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी झपाट्याने आपला प्रचारदेखील सुरू केला आहे. या अनुषंगाने त्यांनी आज चाळीसगाव तालुक्याचा दौरा केला. येथील पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले की, भाजपच्या खासदारांनी येथे कोणत्याही प्रकारचा विकास केला नसून राष्ट्रवादीला संधी मिळाल्यास सर्व खात्यांची कामे मार्गी लावण्यात येतील. यात विविध ठिकाणच्या औद्योगिक वसाहती, जलसिंचन योजना, नार-पार योजना, बलून बंधारे आदींच्या कामांना गती देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव देवकर यांनी केले.
देवकर यांना आपण लोकसभा निवडणुकीच्या तिकीट मागणी मध्ये व इच्छुकांच्या यादीमध्ये सुरुवातीला कुठेही नसताना अचानक आपले नाव जाहीर झाल्याने ही निवडणूक आपल्यावर लादली गेली आहे काय असा प्रश्न विचारला असता लादण्याचा कुठलाही प्रश्न नसून पवार साहेबांचे काही गणिते असतील त्या गणितानुसार मी निवडून येईल हा ठाम विश्वास त्यांना असल्याने मला निवडणूक लढण्याचे सांगण्यात आले नेत्यांनी सांगितलेला आदेश मान्य करून निवडणूक लढणार असल्याचे देवकर यांनी यावेळी स्पष्ट केले.आपण खासदार झाल्यास फक्त रेल्वे थांबवणार नसून केंद्र सरकारच्या विविध विकास योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि मी ज्या ज्या पदावर आज पर्यंत गेलो त्या पदाचे सोने केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आज जो बलून बंधाऱ्यांचा गाजा वाजा होत आहे त्याची मंजुरी आमच्या काळातली असून या सरकारच्या काळात सुरुवातीलाच ते व्हायला हवे होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला या पत्रकार परिषदेस तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख विलास पाटील प्रमोद पांडुरंग पाटील मंगेश राजपूत रवींद्र भैय्या पाटील राष्ट्रवादीचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष दिनेश पाटील नगरसेवक दीपक पाटील रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते
पहा- गुलाबराव देवकर यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ.
नक्कीच देवकर साहेब जळगाव जिल्ह्यात लोक सभा खासदार होतील