मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील पिकाचे उत्पादनावर परिणाम करणारे तण नियंत्रण संदर्भात कोथळी गावात कृषि कन्या यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एकात्मीक पद्धतीतून तणनियंत्रण प्रभावीपणे करता येते असे मार्गदर्शनातून सांगण्यात आले.
शेतात कीटक व रोगांव्यतिरिक्त तण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पीक उत्पादनात नैसर्गिक घटकांमुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकांबरोबर वाढणाऱ्या तणांमुळे येते. विविध पिकांच्या सुरवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनक्षम असतो. या कालावधीत तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. एकात्मीक पद्धतीतून तणनियंत्रण प्रभावीपणे करता येते. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए डि मत्ते व संबंधित विषयातील विषय विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी कन्या प्रेरणा बाविस्कर,दिप्ती चऱ्हाटे ,समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबु पाटील,दीक्षा सोनवणे ह्या विद्यार्थीनी होत्या.