मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थीनी प्रेरणा बाविस्कर, दिप्ती चऱ्हाटे, समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबू पाटील, दीक्षा सोनवणे, स्नेहल इरसे यांनी कोथळी ता. मुक्ताईनगर गावाला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेबद्दल माहिती दिली. आता खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे.
खरीप हंगाममध्ये कापूस, भुईमुग व तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. या बियाण्यांची बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे असते पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून बियाण्यांवर होतात अशा रोगांपासून तसेच किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्वाची असते. बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. त्यामुळे बीज प्रक्रिया ही पिकाच्या पेरणीसाठी खूप महत्त्वाचे आहे, असे सांगण्यात आले. त्यावेळी गावातील शेतकरी सुनंदा नारखेडे, उर्मिला चौधरी, उषा राणे आदी उपस्थित होते.