जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाकी खुर्द येथे आधुनिक तंत्रज्ञान व जैविकशेतीविषयक कृषिदूत चंद्रकांत तेली यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न एच एच मुरलीधर स्वामीजी उद्यान विधि मालेगांव महाविद्यालयाचे कृषिदूत चंद्रकांत गणेश तेली सध्या होत असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थी हे त्यांच्या घरी असून ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत त्यांनी त्यांच्या जवळील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, माती परिक्षण, रासायनिक कीटनाशकांची हाताळणी व जमिनीतील सूक्ष्म पोषक द्रव्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. ए.तूरबठमट, उपप्राचार्य एस. ए. राऊत कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.व्ही.अहिरे, शिक्षिका शिल्पा उदमले, शिक्षक बनसोडे व बागल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.