जळगाव प्रतिनिधी । युवक –युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयातर्फे स्वयंरोजगार सुरू करताना घ्यावयाची काळजी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे शुक्रवार, 24 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
स्वयंरोजगार सुरु करताना घ्यावयाची काळजी या मार्गदर्शन सत्रात प्रशिक्षक, लेखक विनोद अनंत मेस्त्री हे दुपारी 3 ते 3.30 या वेळेत मार्गदर्शन करतील. आरसेटी उस्मानाबादचे विकास गोफणे दुपारी 3.30 ते 3.55 वाजता मार्गदर्शन करतील. तर दुपारी 4 ते 4.30 या कालावधीत प्रश्नोत्तरे होतील. या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.
फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A