रावेर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन

रावेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ प्रगतीशिल शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी तलाठी, कृषी साहाय्यक, ग्राम सेवक यांना स्वतंत्र गाव देऊन शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी बुधवारी संबंधिताना दिल्या. येथील तहसील कार्यालयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतक-यांना मिळावा यासाठी तलाठी, कृषी साहाय्यक, ग्राम सेवकांची कार्यशाळा घेण्यात आली.

तालुक्यात उदयापासून या योजनेवर काम सुरु होणार असुन पहीला दोन हजारांचा हप्ता लवकरच शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यावेळी तहसिलदार विजयकुमार ढगे, कृषी अधिकारी सुधाकर पवार, बीडीओ हबीब तडवी वनक्षेत्रपाल आर. जी. राणे सहाय्यक निबंधक श्री. गायकवाड आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका भरातील ग्रामसेवक, तलाठी व कृषी साहाय्यक उपस्थित होते. शेतक-यांचे आधार कार्ड, बँक पास बुक, शेतीचा उतारा आदी कागदपत्रे शेतक-यांनी जमा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

असा मिळणार शेतक-यांना लाभ
दि. ६ फेब्रुवारीला तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, यांना योजनेसंदर्भात माहिती देऊन प्रशिक्षण देणे, दि. ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान गावनिहाय पात्र खातेदार शेतक-यांची यादी तयार करणे व तपासून खात्री करणे, दि १० ते १२ फेब्रुवारला कुटुंब निहाय वर्गीकरण करून खात्री करणे, दि. ७ ते १५ फेब्रुवारीला शेतक-यांची संगणकीकृत माहितीचे संकलन करणे, दि. १५ ते २० फेब्रुवारी शेतकरी कुटुंबाची यादी गावामध्ये प्रसिद्ध करणे, दि. १५ ते २० फेब्रुवारी नावांवर हरकती घेण्यासाठीचा कालावधी तसेच यादीमध्ये काही दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करणे, दि. २० ते २१ फेब्रुवारीला शेतक-यांच्या कुटुंबाची अंतिम यादी दुरूस्त करून तहसील कार्यालयात संगणकीकृत करून जमा करणे, दि. २२ ते २६ फेब्रुवारी संगणकीकृत शेतक-यांची माहिती महाऑनलाईन संकेतस्थळावर पडताळणी करून अपलोड करण्यात येणार आहे.

यांना मिळणार नाही लाभ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माजी राज्यसभा सदस्य, आजी व माजी आमदार खासदार ,राज्यमंत्री, महापौर, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी निमशासकीय संस्थचे कर्मचारी शासकीय कार्यालयांमधील सर्व अधिकारी, आयकर भरलेल्या व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती, नोंदणीकृत व्यवसायिक, डॉक्टर, चार्टर्ड अकाऊटंट, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Add Comment

Protected Content