जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत इकरा शिक्षण संस्थेचे एच. जे. थीम कला व विज्ञान महाविज्ञालय, जळगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थी व वाहनचालक यांना रस्ते सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सुरक्षीत वाहन चालविणे संदर्भात परिक्षा घेण्यात येवून विजयी विद्यार्थ्यांना मे. पगारिया ॲटो, जळगाव यांचेमार्फत आकर्षक बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. इकबाल, प्राचार्य सैय्यद शुजाअत अली, उपप्राचार्य डॉ. आय. एम. पिंजारी, सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेश भामरे, क्रिडा विभाग संचालक डॉ. चांद खान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाहिद मेहमुद यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.