जळगाव, प्रतिनिधी | आजपर्यंत तुम्ही महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम कित्येकदा पाहिले असतील पण तुम्ही एखाद्या गोमातेच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम झालेला कधी ऐकला आहे काय ? हो तुम्ही बरोबर ऐकत आहात. जळगाव येथे एका महिलेने चक्क गोमातेच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम साजरा केला आहे. जुनी जोशी कॉलोनी परिसरातील रामदास ओंकार अहिरराव यांच्याकडे हा अनोखा कार्यक्रम झाला.
अगदी महिलांची ओटीभरण होते तसाच कार्यक्रम झाला. इतकेच नाही तर व गौमातेला साडी नेसून बाळंतीन सारखा शृंगार देखील केला होता. जळगावातील शोभा रामदास अहिरराव यांनी गोमातेच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम साजरा केला आहे. या संदर्भात शोभा अहिरराव यांनी लाईव्ह लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, त्रिपुरा पोर्णिमेच्या दिवशी आज आमच्याकडे गौमातेचे ओटीभरण झाले आहे. गौमाता ही आपली सर्वांची आई असून त्या मातेचा ही मान राखला पाहिजे हया हेतूने आम्ही तिचा सांभाळ करतो. गौमाता आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य असून आम्ही तिचा सांभाळ मुलीप्रमाणे केला आहे. कुटुंबातील एक महिला सदस्य समजूनच आम्ही गौमातेची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गोमातेच्या ओटी भरायच्या या कार्यक्रमाला शोभा यांच्या मैत्रिणींनी उपस्थित राहून साथ दिली. बाळंतीन बाईची जसे ओटीभरण होते तसेच ओटी भरणी गोमातेची शोभा यांनी केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. ह्या कार्यक्रमासाठी शोभा रामदास अहिरराव, नर्मदा आनंदा जोशी, सुवर्णा मनोज जोशी, रेखा विनायक जोशी, तसेच परिसरातील सर्व स्त्रियांनी सहकार्य केले.