चाळीसगाव, प्रतिनिधी । सर्वसामान्य जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून शासनाने कोरोनाच्या चाचणीचा दर कमी केलेला आहे. मात्र कोरोनावरील औषधांचे जीएसटी जास्त असल्याने तात्काळ जीएसटीत सुट द्यावी अशी मागणी जन आंदोलन खान्देश विभागातर्फे आरोग्य मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोना बांधीत रूग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यात मृत्यूच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. सर्व सामान्यांना परवडेल असे कोरोना औषधांचे दर नसल्याने अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोना औषधांवरील जीएसटी हि १२ ते १८ टक्के असल्याने औषधींच्या किंमती ह्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे कोरोना औषधांवरील जीएसटीवर पुर्णपणे निर्बंध घालून औषधीचे दर कमी करावेत या आशयाची मागणी निवेदनाद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रमुख प्रा. गौतम निकम यांनी केली आहे. औषधांवरील जीएसटी सुट देण्यात आली तर असंख्य रूग्ण हे उपचारासाठी पुढे येत याचा फायदा घेतील. यामुळे काही प्रमाणात मृत्यूदर हे आटोक्यात येण्यास मदत होतील. निवेदनावर जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रमुख प्रा. गौतम निकम, शत्रुघ्न नेतकर, विजय शर्मा, योगेश्वर राठोड, आबा गुजर बोरसे, नाशीर भाई शेख, मिलिंद अशोक भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी अशोक राठोड व भावराव गांगुर्डे आदींच्या सह्या आहेत.