चिंताजनक : जीएसटी कलेक्शन घटले

1498423988 2183

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाची अर्थव्यवस्थेची सध्या गंभीर स्थिती आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढ थेट 0.6 टक्क्यांनी घसरल्यामुळे स्थिती चिंताजनक आहे. जीडीपी दरातील घसरणीनंतर केंद्रातील मोदी सरकारला आणखी एक झटका बसला असून ऑगस्ट महिन्यातील जीएसटीचे कलेक्शन १ लाख कोटी रुपयांपेक्षा खाली आले आहे.

 

महसूल विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये फक्त ९८ हजार २०३ कोटी रुपये जीएसटी कलेक्शन करण्यात केंद्राला यश आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. ऑगस्टमध्ये जीएसटीतून केंद्राला केवळ ९८ हजार २०३ कोटी रुपये वसूल करता आले आहेत. त्यात आयातीतून २४ हजार कोटी रुपये मिळाल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. जुलैपासून ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत एकूण ७५.८० लाख लोकांनी जीएसटीआर ३बी अंतर्गत रिटर्न भरले आहे. त्यातून केंद्राला सुमारे ४० हजार कोटींचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जीएसटीचे ९३ हजार ९६० कोटींचे कलेक्शन झाले होते.

Protected Content