विराट ठरला दशकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज

 

मुंबई : वृत्तसंस्था । टीम इंडियाचा  कर्णधार विराट कोहली  2010 च्या दशकातील सर्वश्रेष्ठ एकदिवसीय क्रिकेटर ठरला आहे. विस्डेन’ने  पुरस्कारासाठी विराटची निवड केली आहे.  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स  सलग दुसऱ्यावर्षी वर्षातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू ठरला आहे.

 

पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या 50 व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक दशकातील 5 फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. 1971 ते 2021 या कालावधीतील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार विराट कोहलीची 2010 मधील दशकासाठी निवड करण्यात आली आहे. विराटने ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंके विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. विराटने तेव्हापासून आतापर्यंत एकूण 254 वनडे सामन्यांमध्ये 12 हजार 169 धावा केल्या आहेत.   विराट हा 2011 च्या वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्यही होता.

 

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांचाही सन्मान करण्यात आला आहे. सचिनची 90 च्या दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर म्हणून निवड करण्यात आली आहे. सचिनने 1998 मध्ये एका वर्षात तब्बल 9 वनडे शतकं झळकावली होती.  टीम इंडियाला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकूवन देणारे कपिल देव हे 1980 च्या दशकातील महान क्रिकेटपटू ठरले आहेत.  कपिल देव यांनी 1983 मध्ये सर्वाधिक विकेट्स आणि सर्वात जास्त स्ट्राईक रेटने 1000 हजार धावा करण्याची कामगिरी केली होती

 

Protected Content