ग.स.सोसायटी निवडणूक : २७८ उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जिल्ह्यात महाराष्ट्र सहकारी संस्था अंतर्गत ग.स.सोसायटी च्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २७८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. यावेळी इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

ग.स.सोसायटी निवडणुकीसाठी २५ मार्चपासून निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून या निवडणुकीसाठी आज गुरुवारी ३१ मार्चपर्यंत एकूण ४४५ अर्ज इच्छुकांनी नेले. त्यापैकी ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत २७८ जणांनी निवडणुक अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यातून लोकमान्य, सहकार, प्रगती, लोकसहकार, आणि स्वराज्य अशा ५ गटातून निवडणूक लढवली जात असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गुरुवारी मुदत संपण्यापूर्वी विलास नेरकर, सुनील निंबा पाटील, सुनील अमृत पाटील, सुनील सूर्यवंशी, गणेश भास्कर पाटील, रवींद्र पाटील, प्रतिभा सुर्वे, उदय पाटील, शैलेश राणे, मगन पाटील, अजबसिंग पाटील, कल्पना पाटील, किशोर पाटील आदी उमेदवारापैकी बहुतांश उमेदवारांनी धावपळ करीत मुदतीच्या आत नामांकन अर्ज दाखल केले.

ग.स. सोसायटी निवडणुकीसाठी ३२ हजार ४४ मतदारांकडून २१ उमेदवार दिले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी १ एप्रिल रोजी जिल्हा बँकेची गणेश कॉलनी शाखेच्या प्रशिक्षण सभागृहात होणार असून सोमवार ४ एप्रिल रोजी वैध अवैध अर्ज यादी जाहीर केली जाईल. तर १८ एप्रिल पर्यत उमेदवारी अर्ज माघारीसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ग.स.सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात असून १९ एप्रिल रोजी निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे.

Protected Content