जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्तने मेहरूण तलाव परिसरातील सिध्दार्थ लॉन येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या अंतर्गत ओम योगा क्लास, सन योगा गृप, माऊली योगा गृप आणि शतायू योग सेंटर यांच्या संयुक्त विद्यामानोन शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान निशुल्क सामुहिक सुर्यनमस्कार शिबीर घेण्यात आले.
याबबात अधिक असे की, शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाच्या अंतर्गत ओम योगा क्लास, सन योगा गृप, माऊली योगा गृप आणि शतायू योग सेंटर यांच्या संयुक्त विद्यामानाने शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान महिला व पुरूष योगसाधक यांच्यासाठी सामुहिक सुर्यनमस्कार व प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात ६० योगसाधक आणि १० योगशिक्षकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी केले. यावेळी योगसाधक किरण दहाड, मनोज जैन, होरिलसिंह राजपूत, साधना बोंडे यांनी आपला अनभुव सांगत योगा करण्याचा सल्ला दिला. यावेळी शतायू योग सेंटरच्या योगशिक्षिका डॉ शरयू विसपुते यांच्या योगसाधकांनी रिदमिक योगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगशिक्षिका अर्चना गुरव, सुषमा सोमवंशी, चित्रा महाजन, डॉ शरयू विसपुते, साधना बोंडे, अग्रवाल मॅडम, योगशिक्षक जितेन्द्र कोतवाल, सुनिता कोतवाल आदींनी परिश्रम घेतले.