मुंबई (वृत्तसंस्था) कुर्ला येथील हॉटेलबाहेर बाहेरून एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर चौघांनी सामुहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
कुर्ला पश्चिमेकडील नवाब शीख पराठा या हॉटेलमध्ये २२ वर्षीय तरुणाने जेवण केल्यानंतर हॉटेलबाहेर येऊन सेल्फी काढली आणि तो फोटो इन्स्टाग्रामवर टाकला. त्याचा हा फोटो पाहून दोन तरुणांनी त्याला संपर्क करत त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितले. काही वेळेतच हे दोघे दुचाकीवरून आले आणि पिडीत तरुणाला मध्यभागी बसवून विद्याविहार येथील नीलकंठ बिझनेस पार्कजवळ नेऊन एका कारमध्ये बसवले. कारमध्ये दोन जण आधीच बसलेले होते. त्यानंतर तिघांनी धावत्या कारमध्येच पिडीत तरुणावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याला कारबाहेर फेकून चौघे पसार झाले. पिडीत तरुणाने १०० क्रमांकावर आणि पालकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांवरून या चौघांना अटक केली आहे.