जळगाव (प्रतिनिधी) ‘एक मानव एक कृति’ अभियानांतर्गत पावसाळी बीज प्रसाराबाबत गट बैठक आज (दि.५) सकाळी ९.०० वाजता शहरातील बहिणाबाई बागेत घेण्यात आली.
या बैठकित मनोज चंद्रात्रे, तुषार वाघुळदे, उपेन्द्र सपकाळे यांनी विचार मांडले. विजय सरोदे, अविनाश चव्हाण, दिनेश पाटील, राजेंद्र महाजन, भगवान कोळी, यांनीही चर्चेत सहभाग घेतला. समुह सदस्यांचा वाढदिवस रोपटे लावून साजरा करणे व त्यांच्या परिवारजनांना पावसाळी बीज प्रसाराबाबत (श्रावण शिवमुठ) माहिती देणे, बीज प्रसारासाठी ग्राम आणि शहरांतर्गत गट बैठका घेणे, अधिकाधिक लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवणे, बीज प्रसारासाठी निरनिराळी माळ राने, ओसाड जागा यावर भ्रमंती, वन्य प्राणी यासाठी पाणवठ्याच्या जागा, वन्य प्राणी व गुरे यांच्यासाठी चारा इ. बाबत निरिक्षणे करुन उपाय शोधणे, बीज प्रसारासाठी गोफणीचा वापर करणे, आदी विषयांवर सभेत चर्चा झाली. बीज संकलन, माती शेणापासून बीज गोळे बनवण्याच्या कामाचे नियोजन याचा यावेळी आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर काही मोजक्या पानथळ जागा शोधून प्रेरणात्मक दृष्ट्या बीजारोपणही करण्यात आले. तसेच काही रोपटीही लावण्यात आली.