यावल येथे शासकीय कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

यावल प्रतिनिधी । तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनासह यावल पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने तुजसाठी मरण ते जनन तुजसाठी जननते मरण तुज सकल चराचर शरण चराचर शरण या विचारांचे देशाचे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावल येथील आज २८ मे रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १o वाजता स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी जि.व्ही. जोशी यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभीवादन केले. यावेळी कनिष्ठ प्रकल्प अधिकारी जी.एम. दिठे, एम.बी. पाटील, एस.एस. तायडे, सुनिता सोनवणे, आर.पी. ढाके, लतेश नेमाडे, एस.पी. लोहारे, वाहनचालक रुबाब तडवी यांच्यासह आदी कर्मचारी व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

दरम्यान यावल तहसीलच्या नविन प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय मध्ये ही आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस महसुल प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , दुख्यम निबंधक कुमार मावळे, तहसीलचे सुयोग पाटील , रामा कोळी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

यावल पोलीस स्टेशनमध्ये पोलिस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस अमलदार संजय तायडे , नितिन चव्हाण , भुषण चव्हाण , निलेश वाघ , हेड कॉन्सटेबलअसलम खान , अशोक जवरे आदींनी उपस्थितीत राहुन स्वातंत्रवीर सावरकर यांना आदरांजली वाहीली .

Protected Content