चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे नुकतेच महात्मा फुले पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सद्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टनसिंगची काळजी ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, प्रा.ए.बी.सूर्यवंशी, डॉ.व्ही.आर.कांबळे, डॉ.एस.ए.वाघ, प्रा.एम.एल.भुसारे, प्रा.व्ही.बी.पाटील, संदीप बोरसे व शशिकांत चौधरी व एल.आर.परदेशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख सहा.प्रा.डी.डी.कर्दपवार यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी माल्यार्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केले. तसेच उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे व इतर उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे आभार सहा.प्रा.विशाल पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा.प्रा. एम.एल.भुसारे व राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.