सिव्हीलमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्‍हा सामान्य रुग्णालयात नोकरी लावून देतो असे, आमीष देत शहरासह जिल्ह्यातील तरुणांची लाखो रुपयांत फसवणुक झाली होती. वर्षभरापुर्वी दाखल गुन्ह्यातील प्रमुख संशयीत गुन्हा घडल्या पासुन फरार होता. जिल्‍हापेठ पेालिस पथकाने त्यास गुजरात येथून अटक करुन आणले आहे. 

शहरातील दिक्षीत वाडी येथील रहिवासी विनायक दामू जाधव (वय-३३) याने १२ ऑक्टोबर २०१९ रेाजी जिल्‍हापेठ पेालिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात नमुद केल्या प्रमाणे,  योगेश सुधाकर पाटील(वय-२९), दिपक काशिराम सोनवणे(वय-२९), मंगेश दंगल बोरसे (वय-४५) अशा तिघांनी संगनमत करुन जिल्‍हा रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आश्वस्त केले हेाते. नोकरी लावून देण्यासाठी विनायक जाधव याची दिडलाखात, धिरज सरपटे(८० हजार), दिनेश एकनाथ पाटील (१ लाख१५ हजार),गौतम शिवचरण चौव्हाण (८० हजार), अजय राजेंद्र खेडकर (८० हजार),  रुपेश प्रेमचंद्र पाटील(१लाख ३० हजार), राकेश भागवत कोळी (१ लाख ३० हजार) यांच्यासह इतर बेरोजगार तरुणांची फसवणुक झाल्या प्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हयातील दिपक सोनवणे याला १७ सप्टेंबर रेाजी तर मंगेश बोरसे याला २१ सप्टेंबर रेाजी अटक करण्यात आली असुन दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा मास्टर माईंड प्रमुख संशयीत योगेश सुधाकर पाटील गुन्हा घडल्या पासुन फरार होता.

गुन्ह्याचे तपासाधिकारी उपनिरीक्षक किशोर पवार, अजीत पाटील, फिरोज तडवी अशांना संशयीताच्या गुजरात वास्तव्याची गुप्त माहिती मिळाली होती. संशयीताचा शेाध घेण्यासाठी पथकाने गुजरात गाठून शोध सुरु केला. येागेश सतत ठिकाणे बदलवत असल्याने तो मिळून येण्यास अडचणी येत होत्या.  गुजरात पेालिसांच्या सहकार्याने संशयीताला अंकलेश्वर ता. भरुच  येथून अटक करुन आज जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयीताला २ डीसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

Protected Content