मराठा क्रांती मोर्चाचा विधानभवनावर धडक लाँग मार्च

पुणे – मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (दि.८) विधानभवनावर धडक लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मराठा क्रांती मोचाची राज्यस्तरीय बैठक रविवारी पुण्यात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र कोंढरे ही माहिती दिली. कोंढरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर विपरीत परिणाम झाला आहे. अकरावी प्रवेशामध्ये अनेक विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळणार नाही.

वैद्यकीय प्रवेशाबाबत मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. एमएसईबी व इतर नोकरभरतीबाबत दिलेला शब्द फिरविला आहे. प्रत्येकवेळी सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवून मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात अधिवेशनादरम्यान ८ तारखेला राज्यभरातून मुंबईतील विधानभवनावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अधिवेधन पुढे ढकलल्यास पायी लाँग मार्च काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्या राजकीय भुमिकांना मराठा क्रांती मोचार्चा पाठिंबा नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळण्याआधीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली. त्यामुळे गायकवाड यांचा राजीनामा घेऊन हकालपट्टी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Protected Content