जामनेर प्रतिनिधी । ज्ञानगंगा बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (दि.२) राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य आर.जे.सोनवणे यांच्याहस्ते करुन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यालयाचे नोडल शिक्षक व्ही.एस.कोळी यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता हीच ईश्वर सेवा’ असे म्हणतं त्यांनी प्लास्टिक मुक्त संदर्भात मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात, विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि क्रीडाशिक्षक व्ही.एन.पाटील यांनी तंबाखूमुक्त शपथ विद्यार्थ्यांकडून बोलवून घेतली. यावेळी प्लास्टिक कचरा संकलन करुया याबाबत आवाहन करण्यात आले असून शालेय परिसरात स्वच्छता जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. नागरिकांना प्लास्टिक मुक्त शहर करुया असा संदेश देण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंदासह कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.