जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव येथे भारताचे पोलादी पुरुष व एकात्म भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सरदार पटेल यांच्या जीवनकार्याची माहिती करून दिली तर काही विद्यार्थ्यांनी या प्रसंगी भाषणे केली. सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.